सल्ला की टोला? ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवले; अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र, अजूनही समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच आहे. पंकजा यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांची समजूत काढत समर्थकांचे राजीनामे नामंजूर केले. यावेळी धर्मयुद्ध टाळत कौरव, पांडवांचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना सल्ला दिला असून ‘नरो वा कुंजरोवा’ होऊ देऊ नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेले, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

    मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र, अजूनही समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच आहे. पंकजा यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांची समजूत काढत समर्थकांचे राजीनामे नामंजूर केले. यावेळी धर्मयुद्ध टाळत कौरव, पांडवांचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना सल्ला दिला असून ‘नरो वा कुंजरोवा’ होऊ देऊ नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेले, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

    पंकजा या भारतीय जनता पक्षाला संघर्ष करायला शिकवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे समजूतदारपणा आहे. म्हणूनच त्यांनी नाराज कार्यकर्यांना राजिनामा देण्यापासून परावृत्त केले. पार्टी हे आपले घर आहे. आपण आपल्या घरातून का बाहेर पडायचे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पंकजा अतीशय समजुतदार नेत्या आहेत. नाराजी व्यक्त करतील, मात्र बंड करणार नाही, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला. प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होणे सहाजिक आहे. पंकजा यांना गोपिनाथ मुंडे यांचा वारसा लाभला आहे. त्या नाराजी व्यक्त करतील पण कधीही बंड करणार नाहीत. राजिनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजावून सांगितले. यातून पंकजा मुंडे यांचा समजूतदारपणा दिसतो, असेही पाटील म्हणाले.

    शकुनी मा.मु. मोठा चतुर ताईंनी कौरावांना चांगलेच झोडपले. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेले. मामूसोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.

    - अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी