कोरोनामुळे क्वारंटाईन ठेवण्यात आलेल्या रुग्णाच्या घरात चोरी

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील सर्वांना क्वारंटाईन ठेवल्याचा परिसरातील चोरांनी डाव साधत काल रात्री त्यांच्या घरात चोरी करून रोख रक्कम लंपास केली आहे. चेंबूर येथील पी.एल लोखंडे मार्गावरील

 मुंबई – कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील सर्वांना क्वारंटाईन ठेवल्याचा परिसरातील चोरांनी डाव साधत काल रात्री त्यांच्या घरात चोरी करून रोख रक्कम लंपास केली आहे. चेंबूर येथील पी.एल लोखंडे मार्गावरील झोपडपट्टीत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. कुटुंबातील सर्वांना क्वारंटाईन कक्षात ठेवले असल्याने घरे बंद आहेत.

या संधीचा फायदा घेऊन मुकुंद नगर परिसरातील महात्मा फुले चाळीत राहणाऱ्या कोरोनाबाधित महिलेच्या घरात रात्री चोरांनी चोरी केली आहे.  कोरोनाबाधित महिलेला पालिकेने काही दिवसांपूर्वी जॉय रुग्णालयात क्वारंटाईन कक्षात ठेवले आहे. तसेच तिचे वडील, भाऊ, आणि वहिनीला चेंबूर येथील सिध्दार्थ कॉलनी जवळील आचार्य नगर एसआरए इमारतीत क्वॉरोटाईन कक्षात ठेवले आहे.

त्यामुळे घर कित्येक दिवसापासून बंद आहे त्यातच परिसरातील चोरांनी याची संधी साधत रात्रीच्या वेळेस घरात घुसून चोरी केली आहे. घरातील कपाट फोडून त्यातील रोख रक्कम १० हजार लंपास केली आहे. या रुग्ण महिलेच्या मोठया बहिणीला याबाबत माहिती मिळताच तक्रार करण्याकरिता सकाळी टिळक नगर पोलीस ठाणे गाठले आहे.