A car that fell into a well; Fortunately no casualties Strange incident happened in Ghatkopar

मुंबईत दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामध्ये झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना तर घडल्याच, पण रविवारी घाटकोपरमध्ये एक विचित्र घटना समोर आली. घाटकोपरमधील एका सोसायटीच्या परिसरात पार्क केलेली कार येथील बुजवलेल्या विहिरीत पडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेचा विहिडिओ व्हायरल झाला आहे.

    मुंबई : मुंबईत दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामध्ये झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना तर घडल्याच, पण रविवारी घाटकोपरमध्ये एक विचित्र घटना समोर आली. घाटकोपरमधील एका सोसायटीच्या परिसरात पार्क केलेली कार येथील बुजवलेल्या विहिरीत पडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेचा विहिडिओ व्हायरल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घाटकोपर पश्चिम येथील कामा लेन येथील राम निवास सोसायटी परिसरात घडली. काही वर्षांपूर्वी या परिसरात एक विहिर होती, जी आरसीसी बांधकामाने बुजवण्यात आली.

    मुंबईत ९ जूनपासूनच मान्सूनने आगमन झाले तेव्हापासून सातत्याने मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे येथील आरसीसीचे बांधकाम कवकुवत झाले आणि नेमकी विहिरीच्या वर उभी केलेली गाडी त्यामध्ये पडली. ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र कार संपूर्ण पाण्यात बुडाल्याने कारचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

    हे सुद्धा वाचा