ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची समिती नेमा अन् योग्य रणनीती करुन पुढे जा : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यासोबतच ठाकरे सरकार घेणाऱ्या निर्णयाला विरोधक म्हणून आम्ही समर्थन देऊ, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते.

    मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय हा सर्वात निराशाजनक असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. न्यायालयाच्या निर्णयावरती आक्रोश न करता त्यावर मार्ग काढला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

    ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यासोबतच ठाकरे सरकार घेणाऱ्या निर्णयाला विरोधक म्हणून आम्ही समर्थन देऊ, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते.

    मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका झाली आणि यासर्व मुद्द्यांवर उच्च न्यायालयानं आपल्या बाजूने निकाल दिला आणि कायदा वैध ठरवला. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली. आपण तिथे मजबूतीने बाजू मांडली. याचिकाकर्त्यांनी आज मांडलेत तेच विषय तेव्हाही मांडले होते. त्यावेळी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण केला आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला आणि स्पष्टपणे हा कायदा सुरु राहील, असं सांगितलं होतं. नंतर जेव्हा नवीन खंडपीठ तयार झालं आणि त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं, त्यावेळी आताच्या सरकारने ज्या बाबी मांडल्या, त्यात कुठेतरी समन्वयाचा अभाव पहायला मिळाला. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.