संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प – छगन भुजबळ

कोरोनासारखे जागतिक संकट असूनही राज्याला पुन्हा प्रगतीकडे नेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे.कोरोनाच्या संकटाने आरोग्य विषयक अनेक आव्हाने राज्यासमोर असताना अजित पवार यांनी आरोग्याला केंद्रस्थानी ठेवतच सर्वच विभागासाठी भरीव तरतुद केली आहे.

    आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, तीर्थ स्थळे यांसह सर्वच क्षेत्रात भरीव तरतूद केल्यामुळे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांचे केले अभिनंदन. आज महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केला यात कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, आलेली संकटे समोर असताना देखील आणि राज्य सरकार मोठे अडचणीत असताना देखील अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला तारणारा अर्थसंकल्प सादर केला याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे…

    राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोनासारखे जागतिक संकट असूनही राज्याला पुन्हा प्रगतीकडे नेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे.कोरोनाच्या संकटाने आरोग्य विषयक अनेक आव्हाने राज्यासमोर असताना अजित पवार यांनी आरोग्याला केंद्रस्थानी ठेवतच सर्वच विभागासाठी भरीव तरतुद केली आहे. आज महिला दिन आहे त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीची सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी प्रवास सवलत योजना राबवण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात येणार असल्याने राज्यातील मुलींना याचा फायदाच होणार आहे.

    अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मंडताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले आहे यामध्ये राज्यसरकाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू, तांदूळ, तूर, मका, इ धान्याची पुरेशी साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी नाबार्डच्या साहाय्याने राज्यात २८० नवीन गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी आत्तापर्यंत ३३४ कोटीरुपये उपलब्ध झाले असून २०२१या वर्षासाठी ११२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर चालू वर्षासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास ३२१ कोटी प्रस्तावित केला आहे आणि यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत.

    याबद्दल पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की राज्यात करोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना घोषित केल्या आहेत.शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा आज अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही आज करण्यात आली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

    महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थाना प्रत्येकी १५० कोटी रुपये निधी, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासप्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

    नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा अर्थसंकल्प-
    नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या सततच्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज त्याचा पुनरुच्चार देखील अजित दादा यांनी आपल्या भाषणात केला. नाशिक सारख्या धार्मिक भूमीचा अधिक विकास करण्यासाठी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर जतन संवर्धन, . क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थ स्थळ विकास, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास, क्षेत्र सप्तशृंगी गड विकास यासाठी भरिव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर पुणे ते नाशिकच्या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी आणि नाशिकच्या निओ मेट्रो साठी राज्य शासनाच्या वाट्याची तरतूद केल्यामुळे संपुर्ण नाशिकच्या जनतेच्या वतीने भुजबळ यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहे.