प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे.  मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात

    मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबात कोणताही निर्णय आज होवू शकला नाही. त्या संदर्भात चर्चा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट उत्तिर्ण करण्याबाबत देखील उद्याच निर्णय अपेक्षीत आहे.

    मिनी टाळेबंदीने परिक्षांवर प्रश्नचिन्ह राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लागू असल्याने मे महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित होते.  राज्यात शनिवारी आणि रविवारी मिनी टाळेंबदी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शनिवारच्या परिक्षांबाबत प्रश्न निर्माण झाला. पहिली ते आठवी प्रमाणे या विद्यार्थ्यानाही उत्तिर्ण केले जाईल, अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.