doctor

‘कोव्हिड योद्धे’ (Covid Yoddha) म्हणून कोरोना संकटात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना विमा (Insurance Protection) नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली. कोरोना संकटात डॉक्टरांनी स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. अडीच लाखांहून अधिक डॉक्टरांनी आपली सेवा दिली. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेत आपले गा-हाने मांडले.

 मुंबई :  डॉक्टरांच्या (Doctors )शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची भेट घेतली. ‘कोव्हिड योद्धे’ (Covid Yoddha) म्हणून कोरोना संकटात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना विमा (Insurance Protection) नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली. कोरोना संकटात डॉक्टरांनी स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. अडीच लाखांहून अधिक डॉक्टरांनी आपली सेवा दिली. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेत आपले गा-हाने मांडले.

कोरोना काळात अडीच हजाराहून अधिक डॉक्टर कोरोलाबाधित झाले आहेत तर १४७ डॉक्टरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. तरी सुद्धा सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, अशा वेळी कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. डॉक्टर आपल्या जिवाची पर्वा न करता रूग्णांची सुश्रूषा करीत आहेत, मात्र सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेची काळजी घेत नसल्याने डॉक्टरांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.