पालक संघटनेच्या शिष्टमंडळाची सोमवारी शिक्षणमंत्रांसोबत बैठक

राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांकडून आकारल्या जाणा-या अवाजवी शुल्कवसुली प्रश्नी सोमवारी २२ फेब्रुवारीला शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांनी दिली.

    मुंबई (Mumbai).  राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांकडून आकारल्या जाणा-या अवाजवी शुल्कवसुली प्रश्नी सोमवारी २२ फेब्रुवारीला शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांनी दिली.

    कोव्हिड-१९(कोरोना) काळामध्ये विनाअनुदानित खासगी शाळांनी पालकांकडून अवाजवी व अनियमित शुल्काची आकारणी केली आहे याला पालकांचा विरोध आहे. या प्रश्नासाठी १७ फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानात फोरम फाॅर फेअरनेस इन एज्युकेशन,इंडियन वाईल्ड पॅरेंटस् असोसिएशन तसेच पॅरेंटस् असोसिएशन,पुणे ह्या संस्थेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील सुमारे १५ प्रमुख पालक संघटनांनी आंदोलन केले होते‌. आंदोलन दिवशी संध्याकाळी या पालक संघटना शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांना भेटण्यासाठी मंत्रालयासमोरील त्या़ंच्या शासकीय बंगल्यावर गेले होते. परंतु त्यांची भेट होऊ शकली नव्हती. परंतु शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सोमवारी पालक संघटनांच्या नेत्यांसमवेत बैठक बोलावली असून यादिवशी पालक संघटनांचे नेते त्यांना भेटणार असल्याचे राजेंद्र साळसकर यांनी सांगितले.

    शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पॅरेंटस् असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था(शुल्लक विनियमन) अधिनियम २०११,मधील शैक्षणिक शुल्काबाबतच्या तरतुदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक २२फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालयीन दालन क्र.३०३,मुख्य इमारत, मंत्रालय , मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीस विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव,शिक्षण आयुक्त,पुणे, अनिल अंतुरकर, वरिष्ठ वकिल(सरकारी वकिलांमार्फत)तसेच पॅरेंटस् असोसिएशनचे अध्यक्ष/सचिव यासह पालक संघटनांचे शिष्टमंडळ या बैठकीस उपस्थित रहाणार असल्याचे बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांनी कळविले आहे.