मुंबईतील हिरे व सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला तब्बल दोन कोटींचा गंडा, पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश मेहता यांच्याकडून 1 कोटी 98 लाख 6 हजार 759 रुपयांचे सुवर्णालंकार व हिऱ्यांचे अलंकार खरेदी केले होते. त्यामुळे मेहता यांनी अलंकाराच्या रकमेची मागणी केली.

    मुंबईतील हिरे व सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला श्रीरामपुरातील सराफ पितापुत्रांनी दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब विश्वनाथ डहाळे व अक्षय बाळासाहेब डहाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

    श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश मेहता यांच्याकडून 1 कोटी 98 लाख 6 हजार 759 रुपयांचे सुवर्णालंकार व हिऱ्यांचे अलंकार खरेदी केले होते. त्यामुळे मेहता यांनी अलंकाराच्या रकमेची मागणी केली. मात्र, डहाळे पिता-पुत्रांनी मेहता यांना पैसेही दिले नाहीत आणि अलंकारही दिले नाहीत. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, या प्रकरणी दिनेश प्रकाश मेहता (, रा. विलेपार्ले, मुंबई) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.