असं इतक झाल तरी काय महिला पोलिसाने आपल्याच सहकाऱ्याच्या हत्येचा कट रचला; गुन्ह्याच्या उलगडा झाल्यावर मुंबई पोलिस खातं हादरले

या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे यांनी या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते व यांच्या मध्ये वादावादी झाली होती. यावादाचा बदला घेण्यासाठी शितल पानसरे ने या हत्येचा कट रचला.

    मुंबई : मुंबई पोलीसात काॅन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानप यांचा १५ ॲागस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला होता मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका नॅनो गाडीने मागून येवून शिवाजी सानप यांना उडवले व यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीसांना सांगितले. पनवेल पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता दोघाव्यक्तींकडून मयत शिवाजी सानप यांचा मुंबईतून पाठलाग केल्याचे दिसून आले. या दोघाही संशयितांना ताब्यात घेतले असता खरी हकीकत समोर आली.

    या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे यांनी या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते व यांच्या मध्ये वादावादी झाली होती. यावादाचा बदला घेण्यासाठी शितल पानसरे ने या हत्येचा कट रचला.

    या हत्येसाठी वापरण्यात आलेली नॅनो कार पुरावा नष्ट करण्यासाठी तरघर येथील निर्जन स्थळी जाळून देखील टाकण्यात आली. पनवेल पोलिसांनी अतिशय शिताफीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपी शीतल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तीनही आरोपींना अटक केली आहे.