विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मदत जाहीर

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

  विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

  दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

  विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

  ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला असून ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे असे विरार अ. केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.
  सदर घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे:-
  १) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
  २) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
  ३) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
  ४) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
  ५) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
  ६) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
  ७) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
  ८) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
  ९) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
  १०) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
  ११) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
  १२) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
  १३) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)

  कोविड-१९ च्या प्रकोपाने राज्यभर जनता मेटाकुटीस आली असताना रूग्णालयांमध्ये सातत्याने अपघात आणि अपमृत्यू होताना दिसत आहेत. नाशिक मधील वायुगळती प्रकरणानंतर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

  उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्र्यानी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून चर्चा केली. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.  ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रूपये मदतीची घोषणा देखील केली आहे.