A goat of one crore! 'Allah' why tiger

बकरी ईद पूर्वी टायगरचा मालक जेव्हा त्याला बाजारात विकायला गेला, तेव्हा खरेदीदारांनी त्याची बोली 36 लाखांवर ठेवली. या बोलीनंतर टायगरचा मालक त्याला घेऊन परत आला. टायगरचा मालक सांगतो की या बोकडासाठी कोणी एक कोटी रुपये दिले तरच तो टायगरला विकेल. सध्या या बोकडासाठी लोक 51 लाख रुपयांपर्यंत देण्यास तयार आहेत.

    मुंबई : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात टायगर नावाचा एक बोकड आजकाल बराच चर्चेत आहे. या बोकडाच्या गुणवत्तेमुळे त्याला पाहण्यासाठी अनेक लोक खूप लांबून येत आहेत. हा बोकड विकत घेण्यासाठी आतापर्यंत 36 लाखांची बोली लावण्यात आली आहे, पण टायगरचा मालक त्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करत आहेत. त्याच्या मालकास देखील टायगरच्या गुणवत्तेबद्दल माहिती नव्हती.

    बकरी ईद पूर्वी टायगरचा मालक जेव्हा त्याला बाजारात विकायला गेला, तेव्हा खरेदीदारांनी त्याची बोली 36 लाखांवर ठेवली. या बोलीनंतर टायगरचा मालक त्याला घेऊन परत आला. टायगरचा मालक सांगतो की या बोकडासाठी कोणी एक कोटी रुपये दिले तरच तो टायगरला विकेल. सध्या या बोकडासाठी लोक 51 लाख रुपयांपर्यंत देण्यास तयार आहेत.

    टायगरची खास गोष्ट म्हणजे हा बराच मोठा बोकड आहे. याच्या सामर्थ्याचा अंदाज अशाप्रकारे घेता येतो की, त्याला हाताळण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता भासते. याशिवाय सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे जन्मजात त्याच्या शरीरावर असे लिहिलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याला विकत घ्यायचे आहे.