शेतकऱ्यांचं वादळ मुंबईत, का आली शेतकऱ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ?

कृषी कायद्याविरोधात देशाच्या राजधानीसोबतच आर्थिक राजधानीत सुद्दा शेतकरी आंदोलनाचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि एकूण पाच मंचांनी मिळून शेतकरी मोर्चा तयार केला आहे. तसेच हा मोर्चा मुंबईत धडकला असून आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहेत.

मुंबई : कृषी कायद्याविरोधात देशाच्या राजधानीसोबतच आर्थिक राजधानीत सुद्दा शेतकरी आंदोलनाचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि एकूण पाच मंचांनी मिळून शेतकरी मोर्चा तयार केला आहे. तसेच हा मोर्चा मुंबईत धडकला असून आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आझाद मैदानात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आंदोलाना पाठिंबा देणार आहेत. परंतु शेतकऱ्यांनी हा मोर्चा कशासाठी काढला आहे. तसेच त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत. हे आपण जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे, शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कायदे रद्द करा, देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनी खालसा करुन ७/१२ वरिल नावं पूर्ववत करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतमालाला भाव देण्यासाठी हमी भाव कायदा करा. शेतकरी विरोधी वीज बिलाचा कायदा आणि वीज पुरवठा करण्यात यावा.