
भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. ही वक्तव्ये खरी होताना दिसत आहेत. कारण, दौंड, औरंगाबाद, भिवंडीसह मिरा-भाईंदरमधील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपसाठी जबरदस्त झटका आहे. या मेगाभरतीमुळे राष्ट्रवादीची पॉवर वाढली आहे.
मुंबई : भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. ही वक्तव्ये खरी होताना दिसत आहेत. कारण, दौंड, औरंगाबाद, भिवंडीसह मिरा-भाईंदरमधील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपसाठी जबरदस्त झटका आहे. या मेगाभरतीमुळे राष्ट्रवादीची पॉवर वाढली आहे.
भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवक, मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे, माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
भिवंडीसह मिरा-भाईंदर आणि औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत, अमरावतीमधील डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांनी प्रवेश केला.
आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
या पक्ष प्रवेशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.