मुंबईतील प्रभादेवी येथील गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे १६ बंब घटनास्थळी दाखल

राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती. या घटनेला दोन दिवस पूर्ण झाले असून त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आज आगीच्या घटना घडल्या आहेत.

    मुंबई : मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आज भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे १६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत १२ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. मात्र या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

    राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होत. या घटनेला दोन दिवस पूर्ण झाले असून त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आज आगीच्या घटना घडल्या आहेत.

    बदलापुरात एका बंद केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तसेच या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण ९ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी ६ वाजता ही आग नियंत्रणात आली.