मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागली भीषण आग

आग मोठ्या प्रमाणात लागल्याने विझविण्याचे काम सुरु आहे. क्रॉफर्ड मार्केमध्ये दुकानात आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्टर झाले नाही. तसेच अग्निशमन दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉक सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध मार्केमध्ये सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईमधील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानात आग लागली होती. आग पसरल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. 

आग मोठ्या प्रमाणात लागल्याने विझविण्याचे काम सुरु आहे. क्रॉफर्ड मार्केमध्ये दुकानात आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच अग्निशमन दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉक सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

तसेच आगीत कोणत्याही प्रकरची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मागे जुन महिन्यात याच मार्केमध्ये भीषण आग लागली होती. लॉकडाऊन असल्यामुळे त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.