बोरीवलीतील सेव्हन्थ स्टोरे या इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग…

बोरीवली येथील सेव्हन्थ स्टोरे या रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. येथील गांजावाला लेनमधील गांजावाला रेसिडन्सी इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन दलाच्या ४ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    मुंबई : बोरीवली येथील सेव्हन्थ स्टोरे या रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. येथील गांजावाला लेनमधील गांजावाला रेसिडन्सी इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे.

    आगीची माहिती मिळाल्यावर तात्काळ अग्निशमन दलाच्या ४ ते ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये इमारतीचा सातवा मजला पूर्णपणे जळून खाक झाला असून, आगीवर नियंत्रण आणत असताना, अग्नीशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या जवानाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही इमारत पेट्रोल पंपाशेजारी असल्याने पंपावरील काम बंद करण्यात आले आहे. आगीचा भडका वाढत चालल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब लागत आहे, या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

    साडे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर निय़त्रंण मिळवण्यास यश. आग पूर्णत: विझली असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही, मात्र अग्निशमन दलातील एक जवान १८ टक्के भाजला आहे, त्याला सुरुवातीला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते, पण त्यानंतर नॅशनल बर्ण रुग्णालय, ऐरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते. L-1 लेव्हलची आग लागली होती. सकाळी सात वाजता आग लागली होती. त्यानंतर चार तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यास अग्निशमन दलातील जवानांना यश आले आहे.