A love letter that went viral before the budget

हे पत्र लिहीणारा प्रेमवीराचे नाव विनोद S असे आहे. तो कुठे राहणारा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला जी तरुणी आवडते तिचे नाव अनुष्का आहे. पेट्रोल महाग झाल्याने मी तुझ्या मागे फिरु शकत नाही. त्यामुळे तु माझे प्रेम पत्र स्वीकार कर असं म्हणत या तरुणाने तरुणीला प्रपोज केले आहे.

  मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना प्रेमवीरांना देखील याचा फटका बसत आहे. पेट्रोल महाग झाल्याने प्रेयसीला इंप्रेस करणे परवडत नसल्याने एका प्रेम वीराने तीला थेट पत्र लिहीले आहे. हे प्रेम पत्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालं आहे.

  हे पत्र लिहीणारा प्रेमवीराचे नाव विनोद S असे आहे. तो कुठे राहणारा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला जी तरुणी आवडते तिचे नाव अनुष्का आहे. पेट्रोल महाग झाल्याने मी तुझ्या मागे फिरु शकत नाही. त्यामुळे तु माझे प्रेम पत्र स्वीकार कर असं म्हणत या तरुणाने तरुणीला प्रपोज केले आहे.

  महाराष्ट्रच्या अर्थसंकल्पानंतर राज्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार असल्याची चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पात कर कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या दरवाढीतून दिलासा मिळणार आहे.

  काय आहे या प्रेम पत्रात

  प्रिय अनुष्का…
  मी विनोद S खूप दिवसांपासून तुझ्या प्रेमात पडलो आहे. जेव्हा मी तुला पाहिले तेव्हाच तु माझ्या मनात आणि ह्रदयात बसलीस. पण, वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे मी तुझ्यापाठीमागे कॉलेजला नाही येवू शकत. त्यामुळे तु मला कधी पाहिले नसशील.
  पण, मोदींनी पेट्रोलचे दर कमी केले तर दररोज तुझ्या पाठीमागे कॉलेजला येईल असं आश्वासन देतो. मला महित आहे तु माझे हे पत्रपत्र स्वीकार करशील व लवकरात लवकर या पत्राचे उत्तर मला देशील अशी मी आशा करतो आणि माझे प्रेम पत्र इथेच संपवतो…
  तुझाच…