पदोन्नतीच्या आरक्षणाच्या मुद्यावर येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

कॉंग्रेस मंत्र्यानी या विषयावर आज चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आज या विषयावर चर्चा न करता मंगळवारी उपसमितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई  : पदोन्नतीच्या आरक्षणाच्या मुद्यावर येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून त्यात योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

    कॉंग्रेस मंत्र्यानी या विषयावर आज चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आज या विषयावर चर्चा न करता मंगळवारी उपसमितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

    दरम्यान कॉंग्रेस मंत्र्यानी आज मंत्रिमंडळात काही झाले तरी निर्णय झाला पाहिजे अशी भुमिका घेतली होती. मात्र या मुद्यावर सविस्तर चर्चा उपसमितीमध्ये होवू शकेल असे सांगण्यात आले. त्यामुळे तुर्तास या मुदयावरील तणाव कायम असला तरी निर्णय प्रलंबित राहिला आहे.