मित्र घरी नसल्याने त्याच्यातल्या हैवानाने डाव साधला; जीवे मारण्याची धमकी दिली अन् पत्नीवर केला बलात्कार

नौदल अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने मुंबईतील कुलाबा परिसरात भाड्याने घर घेतले आहे. संबधित अधिकारी प्रशिक्षणासाठी केरळ येथे काही दिवसांसाठी गेला होता. दरम्यानच्या काळात एका अविवाहित सहकाऱ्याने त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला.

  मुंबई : शहरात लॉकडाऊनमध्येही गुन्हेगारी कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे. नुकतीच नौदल अधिकाऱ्याने सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर १७ मे रोजी हा प्रकार पोलिसांना कळाला. गेल्या महिन्यात महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी दिली आहे.

  नौदल अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने मुंबईतील कुलाबा परिसरात भाड्याने घर घेतले आहे. संबधित अधिकारी प्रशिक्षणासाठी केरळ येथे काही दिवसांसाठी गेला होता. दरम्यानच्या काळात एका अविवाहित सहकाऱ्याने त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला. सहकाऱ्याने नौदल अधिकाऱ्यांच्या पत्नीवर घरी जाऊन अत्याचार केल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.

  केरळवरून घरी परतल्यानंतर पीडितेने तिने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. मोठी हिंमत करून तिने पतीला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याआधी आरोपीकडून पीडितेला जीवे मारण्याची तसेच पतीला खोटे सांगून बदनामी करण्याची धमकी देण्यात येत होती. तरी मोठ्या हिंमतीने पीडितेने पतीला सर्व कहानी कथन केली.

  पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर समोर आलेली माहिती अशी की, नौदल अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याचा सहकारी त्याच्या पत्नीला भेटायला घरी आला. त्याला नुकतेच प्रमोशन मिळाल्याने त्याने आनंदात तिला भेटही आणली होती. परंतु डोकं दुखत असल्यामुळे ती बेडरूममध्ये विश्रांतीसाठी गेली.

  दरम्यान, डोकं दाबून देण्याच्या, मसाज करून देण्याच्या निमित्ताने त्याने बेडरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. आरोपीवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

  a naval officers wife was raped by a colleague colaba police investigate nrvb