एखाद्या प्रदेशातील लोक जेव्हा कर्तृत्व गाजवतात, तेव्हाच त्या भागातील भाषादेखील समृद्ध होत असते. जेव्हा जेव्हा मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा काळ होता, तेव्हा तेव्हा मराठी भाषादेखील समृद्ध झाली, असं मत माजी साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं.

भाषा हे व्यवहाराचं साधन आहे. व्यवहार वेगळ्या भाषेत होत असतील, तर मातृभाषा समृद्ध होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठी भाषेतील शिक्षणाचा मुलांच्या बौद्धिक विकासाशी घनिष्ठ संबंध असून पालकांनी मुलांना काही गोष्टी पुरवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. काय नेमक्या या गोष्टी आहेत? मराठी भाषा का टिकली पाहिजे? मराठी लोकांना चुकीच्या मराठीचा का राग येत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉ. सदानंद मोरे यांनी या मुलाखतीत दिली आहेत. जरूर पाहा.

भाषा हे व्यवहाराचं साधन आहे. व्यवहार वेगळ्या भाषेत होत असतील, तर मातृभाषा समृद्ध होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठी भाषेतील शिक्षणाचा मुलांच्या बौद्धिक विकासाशी घनिष्ठ संबंध असून पालकांनी मुलांना काही गोष्टी पुरवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. काय नेमक्या या गोष्टी आहेत? मराठी भाषा का टिकली पाहिजे? मराठी लोकांना चुकीच्या मराठीचा का राग येत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डॉ. सदानंद मोरे यांनी या मुलाखतीत दिली आहेत.