प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात शनिवारी ३,९४० नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ३,११९ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,८१,८४१ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.१४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ७४ कराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,९२,७०७ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६१,०९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई (Mumbai).  राज्यात शनिवारी ३,९४० नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ३,११९ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,८१,८४१ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.१४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ७४ कराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,९२,७०७ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६१,०९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शनिवारी ७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७४ मृत्यूपैकी ३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू औरंगाबाद-१४, पुणे-३, सांगली-२, नाशिक-२, अमरावती-१, जळगाव-१, ठाणे–१, रायगड-१ आणि साेलापूर-१ असे आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२०,५९,२३५ प्रयाेगशाळा ;नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,००,३६० व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ४,०२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.