कोरोनाच्या सावटात उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

राज्यावर कोरोनाचं मोठं संकट असतानाच सोमवारपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यावेळी चहापानाचा कार्यक्रम आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी ११ वाजता तर परिषद दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

मुंबई : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच राज्यावर कोरोनाचं मोठं संकट असतानाच सोमवारपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यावेळी चहापानाचा कार्यक्रम आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी ११ वाजता तर परिषद दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अगदी साध्या पद्धतीने अधिवेशन पार पडणार आहे. राज्यात कोरोनाचा धोका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली असून आणखी ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ३५ आमदार आणि ७ ते ८ मंत्र्यांचा समावेश आहे.

२०२०-२१ च्या पुरवण्या मागण्या सभागृहात बहुमतासाठी ठेवल्या जातील. विधानसभा अध्यक्ष हे नवीन तालुकापदी नावं जाहीर करतील. तर माजी राष्ट्रपत्ती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, आमदार अनिल राठोड, सुधाकर पंत परिचारक यासह काही विधीमंडळ सदस्य पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडतील अशी माहिती देण्यात आली आहे.