एक प्रभाग एक नगरसेवक; मुंबईत हीच पद्धत राहणार

मुंबई वगळता राज्यातील इतर महानगर पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. ही पद्धत भाजपा सरकार राज्यात सत्तेत असताना अवलंबिण्यात आली होती. आता या पद्धती ऐवजी एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लागू केली आहे, ही पद्धत पुन्हा लागू केल्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जारी केले आहेत.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेची निवडणूक एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने होणार की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार, याचर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. मुंबईत एक प्रभाग एक नगरसेवक हीच पद्धत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकित कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

    मुंबई वगळता राज्यातील इतर महानगर पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. ही पद्धत भाजपा सरकार राज्यात सत्तेत असताना अवलंबिण्यात आली होती. आता या पद्धती ऐवजी एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लागू केली आहे, ही पद्धत पुन्हा लागू केल्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जारी केले आहेत.

    मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढच्या वर्षी हाेणार असून निवडणूकीपूर्वी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट पासून सुरू करावी आणि आराखडा तयार होताच ई मेल द्वारे निवडणूक आयोगाला अवगत करावा, त्यामुळे प्रभाग पालिका निहाय पुढील कार्यवाही करता येईल. असे आदेश निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आयुका आयुक्तांना दिले आहेत. आता एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत मुंबईसह राज्यात लागू कायम राहणार असल्याचे समजते.

    बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा अपक्ष उमेदवारांना होतो. निवडून आल्यानन्तर या अपक्ष नगरसेवकांचा गट एखाद्या मोठया राजकीय पक्षाला पाठिंबा देतो. या पद्धतीचा फायदा राज्यातील विरोधी पक्षाला होत असल्याचे महाविकास आघाडीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीचा फायदा सत्ताधारी पक्षाला होईल. तसेच मोठ्या राजकीय पक्षांना होईल,मात्र या पद्धतीचा फायदा अपक्षांना फायदा होणार नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.

    एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही पद्धत कायम ठेवण्याबाबत किंवा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत निवडणूक आयोगाकडून किंवा राज्य सरकार कडून पालिकेकडे अध्याप कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

    संगीता शर्मा, चिटणीस, (प्रभारी) मुंबई महानगरपालिका