Aamir Khan thanked the Ministry of Water Power for taking note of the work of Pani Foundation
पानी फाउंडेशनच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आमीर खानने मानले जल शक्ति मंत्रालयाचे आभार

मुंबई : जल संरक्षणाप्रती (Water conservation) आमीर खान (aamir khan) आणि किरण राव (kiran rao) यांच्या ‘पानी फाउंडेशन’ (Pani Foundation) द्वारे करण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने (Ministry of Water Power ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया (social media) हँडलवरून त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिण्यात आले,”आज आम्ही ‘पानी फाउंडेशन’च्या कार्याचा गौरव करत आहोत, ज्याची स्थापना प्रसिद्ध अभिनेता श्री अमीर खान आणि त्यांची पत्नी श्रीमती किरण राव यांच्याद्वारे करण्यात आली आहे. ही एनजीओ (ngo) महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये समृद्धी आणण्याचे कार्य करत आहे. या एनजीओद्वारे सुरू करण्यात आलेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ एक कौतुकास्पद मोहीम आहे. #CelebratingNGO”

या मान्यतेसाठी आणि त्यांच्या उत्साहजनक शब्दांसाठी, सुपरस्टार आमीर खानने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक हार्दिक संदेश लिहित जलशक्ती मंत्रालयाचे आभार मानले. ज्यामध्ये अभिनेत्याने जल मंत्रालयाला धन्यवाद दिले.
आमीर खानने लिहिले की,”किरण आणि मी, आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल मी, पानी फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्यातर्फे जलशक्ति मंत्रालयाला धन्यवाद देऊ इच्छितो.

महाराष्ट्रात दुष्काळाविरुद्ध या लोक-आंदोलनाला अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. आमचे देणगीदार आणि या प्रयत्नांमध्ये योगदान देत या प्रवासाचा भाग राहिलेल्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या सहयोगाशिवाय हे शक्य नव्हते.

आपल्या विनम्र शब्दांनी आम्हाला आशा आणि शक्ति प्रदान केली आहे. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये निरंतर कार्यरत असून महाराष्ट्रातील हजारो जल हीरोंसोबत काम करून आम्ही धन्य झालो आहोत. धन्यवाद

 

आमीर खानने आपल्या ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी “पानी फाउंडेशन” मिशन आपले प्रत्येक संभाव्य प्रयत्न करत आहे. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील गावांमध्ये जल संरक्षण आणि वाटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते.

आमीर खान सध्या आपला आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट “लाल सिंह चड्ढा” मध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत करीना कपूर खान असून हा चित्रपट ख्रिसमस २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.