वीज कनेक्शन तोडण्याच्या वादात ‘आप’ची उडी; थेट मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

जनतेला वीज बिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देऊ असे सांगणाऱ्या सरकारने विशेष करुण ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री यांनी हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटरधारकांना आणि शेतकऱ्यांना सवलत द्यावी. नोव्हेंबरमध्ये काढलेल्या आदेशाप्रमाणे ‘सध्या हप्ते बांधून देत आहोत’ असे सरकार तर्फे सांगितले जात आहे, परंतु सरकार त्यावर व्याज आकारणी करुण सावकारप्रमाने जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. एकूणच याचा कुणालाही फायदा झालेला नाही. आता पुन्हा लॉक डाऊनचे सावट असल्याने ही व्याज आकारणी म्हणजे सरकारची सावकारी पद्धतीने वसुली ठरते आहे.

    मुंबई : कोविड-19 महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्यातील जनतेची परिस्थिती फारच बिकट होती आणि आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. मागच्या महिन्यात अनेक जिल्ह्यामध्ये लॉक डाउन होते, असे असतांना सरकारने बिल न भरू शकलेल्या जनतेची वीज जोड़णी कापण्यास सुरवात केली आहे. या वादात आता आम आदमी पार्टीने (आप) उडी घेतली आहे.

    अजून जनजीवन सुरळीत झालेले नसताना पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार सामान्य माणसाच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवत लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी जाहीर करावी अन्यथा आम आदमी पार्टी जनतेला फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर 19 एप्रिल रोजी सत्याग्रह करेल असा जाहीर इशारा ‘आप’ चे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी दिला आहे.

    ही मागणी करीत असताना शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे 300 यूनिट पर्यन्त 30% दर कमी करण्याचे आश्वासन आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या शपथनाम्याप्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन याची आठवण आम आदमी पार्टीने करून दिली आहे. महाराष्ट्रातील वीजदर देशात सर्वात जास्त असल्याने ते कमी केले तर जनतेला निश्चित दिलासा मिळू शकतो.

    जनतेला वीज बिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देऊ असे सांगणाऱ्या सरकारने विशेष करुण ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री यांनी हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटरधारकांना आणि शेतकऱ्यांना सवलत द्यावी. नोव्हेंबरमध्ये काढलेल्या आदेशाप्रमाणे ‘सध्या हप्ते बांधून देत आहोत’ असे सरकार तर्फे सांगितले जात आहे, परंतु सरकार त्यावर व्याज आकारणी करुण सावकारप्रमाने जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. एकूणच याचा कुणालाही फायदा झालेला नाही. आता पुन्हा लॉक डाऊनचे सावट असल्याने ही व्याज आकारणी म्हणजे सरकारची सावकारी पद्धतीने वसुली ठरते आहे.

    मध्यंतरी विधानसभेत ‘ चर्चा होईपर्यंत वीज तोडणी थांबवण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केली होती आणि पुन्हा लगेचच यु टर्न घेतला. काही शहरात लॉकडाउन असून सुद्धा विज तोडणी सुरूच आहे, अशी टीका आपने केली. मार्च पासून राज्यातील शेतकरी सुद्धा लॉकडाउन आणि अस्मानी संकटात अडकला आहे. त्यांच्यासाठी आणलेली योजना फसवी आहे, कुणीही शेतकरी आता रक्कम भरूच शकत नाही, त्यामुळे त्यांना माफी देणे गरजेचे आहे असे आपने म्हटले.