आरे दुधाच्या विक्रीत ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वितरकांनाही मिळणार कमिशन?

आरे शक्ती गाय दुधासाठी प्रति लिटरला ३.५० रुपये एवढे वितरण कमिशन दिले जात होते, ते आता ४ रुपये केले आहे. तर गाय टोन्ड दूध व फुल क्रीम दुधाचे वितरण कमिशन ३ रुपयांवरून ३.३० रूपये केले आहे. आरे शक्ती गाय दुधाचा प्रति लिटरचा सध्याचा दर ४१ रुपये आहे, त्यामध्ये १ रुपयांची वाढ झाली असून यापुढे ४२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर अर्धा लिटर दुधासाठी २१ ऐवजी आता २२ रुपये मोजावे लागणार आहेत.

राज्य सरकारने (state government) दुधाच्या विक्री दरात वाढ करतानाच वितरकांच्या कमिशनमध्येही (distributors will get commission) वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई (Mumbai)  दूध योजनेंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या आरे शक्ती गाय दूध (Aarey milk) , टोन्ड दूध, म्हैस फुल क्रीम दुधाच्या प्रतिलिटर विक्री दरामध्ये एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. तसेच येत्या १६ ऑक्टोबरपासून वाढिव दर लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

आरे शक्ती गाय दुधासाठी प्रति लिटरला ३.५० रुपये एवढे वितरण कमिशन दिले जात होते, ते आता ४ रुपये केले आहे. तर गाय टोन्ड दूध व फुल क्रीम दुधाचे वितरण कमिशन ३ रुपयांवरून ३.३० रूपये केले आहे. आरे शक्ती गाय दुधाचा प्रति लिटरचा सध्याचा दर ४१ रुपये आहे, त्यामध्ये १ रुपयांची वाढ झाली असून यापुढे ४२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर अर्धा लिटर दुधासाठी २१ ऐवजी आता २२ रुपये मोजावे लागणार आहेत.

गाय टोन्ड दुधाचा प्रति लिटरचा दर ३७ करून ३८ रुपये झाला आहे. फुल क्रीम दुधाचा सध्याचा प्रति लिटरचा दर ४६ रुपये आहे, त्यामध्येही १ रुपयांची वाढ होऊन ४७ रुपये झाला आहे.