सीएसएमटी ते कल्याण मध्य मार्गावर एसी लोकल धावणार, प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार

मध्य रेल्वेने (Central Railway) सीएसएमटी ते कल्याण (CSMT-Kalyan) मध्य मार्गावर एसी लोकलला हिरवा कंदिल (Green Signal) दाखवला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे.

पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर एसी लोकल (AC Local) दाखल झाल्यानंतर आता मध्य रेल्वेकडे एसी लोकल कधी सुरू होणार याची प्रवासी वाट पाहत होते. परंतु मध्य रेल्वेने (Central Railway) सीएसएमटी ते कल्याण (CSMT-Kalyan) मध्य मार्गावर एसी लोकलला हिरवा कंदिल (Green Signal) दाखवला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. यामध्ये दर दिवस एसी लोकलच्या १० फे-या मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहेत.

जानेवारी २०२० मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र एसी लोकलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळत असल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती. मात्र आता मुख्य मार्गावर सीएसएमटी-कल्याण दरम्यान ही लोकल सेवा सुरु करण्यास मध्य रेल्वेने परवानगी दिली आहे.

यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर सकाळी वातानुकूलित एसी लोकलच्या दोन फे-या आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इतर फे-या सोडण्यात याव्या यावर विचार सुरु आहे असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.