चिखलोली रेल्वे स्थानकाकरिता जमीन संपादनाच्या प्रक्रियेला वेग

चिखलोली रेल्वे स्थानक सुरू करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथ व बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाली असून या रेल्वे स्थानकाकरिता जमीन संपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बुधवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ तहसीलदार व रेल्वे प्रशासनाचे अभियंता यांच्यासह नियोजित रेल्वे स्थानकाच्या जागेची पाहणी केली.

याप्रसंगी तहसीलदार जयराज देशमुख, रेल्वेचे उप मुख्य अभियंता एम.जी. कटके, भूमिअभिलेख उपअधीक्षक  मीना पांढरे, विकास अडांगले, शाखा प्रमुख रामदास मोहपे, युवासेना तालुका अधिकारी शैलेश भोईर, स्थानिक गावकरी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.