चेंबूरमध्ये दरड कोसळून १९ जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली आहेत. या ढिगाऱ्याखाली १९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते.

  रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत ढिका-याखालून १६ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे.

  चेंबूर आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान विक्रोळी येथील डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचा छत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली आहेत.

  या ढिगाऱ्याखील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते.

  चेंबूरमध्ये ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी अरुंद गल्ल्या आहेत. हे काही उंचीवर देखील आहे. यामुळे एनडीआरएफ टीमला तिथे पोहोचणे अवघड झाले. बंदोबस्ताच्या बाहेरच रुग्णवाहिका उभ्या असून सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्थानिक लोकांचीही मदत यात घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री साडे बारा वाजता हा अपघात झाला असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

  दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने या अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांना पीएम रिलीफ फंडमधून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

  बचाव कार्यासंदर्भात माहिती देताना NDRF चे इन्स्पेक्टर राहुल रघुवंश म्हणाले की, “आम्हाला सकाळी ५ वाजता माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि २ मृतदेह बाहेर काढले. त्या आधी इथल्या लोकांनी १० मृतदेह बाहेर काढले होते. लोकांच्या म्हणण्यानुसार आणखी ७-८ लोक अजूनही ढिगार्‍याखाली अडकले आहेत. हे ऑपरेशन आणखी सुमारे ३ ते ४ तास अधिक सुरू राहणार आहे.”

  दरम्यान, जवळपास पाच-सहा तास तुफान बरसणाऱ्या पावसाने मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतेय.