According to Amit Shah, the Mumbai Municipal Corporation had left power last time; BJP leader's assassination

२०१७ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतरच मुंबईचे महापौरपद भाजपाला मिळाले असते, मात्र तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांच्या सांगण्यावरुन भाजपाने एक पाऊल मागे येत शिवसेनेला सत्तेचा मार्ग मोकळा करुन दिला असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

मुंबई : ऐन थंडीत मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation elections) रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

२०१७ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतरच मुंबईचे महापौरपद भाजपाला मिळाले असते, मात्र तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांच्या सांगण्यावरुन भाजपाने एक पाऊल मागे येत शिवसेनेला सत्तेचा मार्ग मोकळा करुन दिला असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपा संधी हातातून गमावणार नाही  असे म्हणत पाटील यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

आगामी निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. गेल्या वेळी भाजपाला ८२ जागा मिळाल्या होत्या.  त्याचवेळी भाजपाकडे महापौरपद आले असते.  मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सत्ता टिकवायची असल्याच्या कारणाने  अमित शाह यांच्या सांगण्यावरुन मुंबई महापालिका शिवसेनेला सोडली असेही चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

२०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या होत्या  याची आठवणही चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली आहे. त्यावेळी फक्त दोन जागा बरोबरीला कमी पडल्याचेही त्यांनी सांगितले. मुबंई महापालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली असून, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना आणि भाजपा या दोन्हा पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत.  त्यातच कोरोना,  सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण,  मराठा आरक्षण,  कांजूरमार्ग मेट्रो कार शेड यासारख्या मुद्द्यांवरुन दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोपही केला आहे. शिवसेनेकडूनही या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. येत्या काळात या दोन्ही पक्षांतील चुरस आणखी वाढलेली पाहायला मिळेल.

मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना,  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार?  मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार?  याकडेur सगळ्यांचे लक्ष असणार आहे. काँग्रेसने आत्तापासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.