मुंबई पालिकेच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यास ३ दिवसांचा विलंब, किरीट सोमय्यांनी पोलिसांकडे केली तक्रार

मुंबई महानगरपालिकेकडून(BMC Order) कोरोना पॉझिटिव्ह अहवाल ३ दिवसांसाठी (corona positve report delayed by 3 days)लांबविला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून(BMC Order) कोरोना पॉझिटिव्ह अहवाल ३ दिवसांसाठी (corona positve report delayed by 3 days)लांबविला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेेशनमध्ये फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

    कोरोना चाचणीचा रिपोर्ट मुद्दामहून ३ दिवस उशीरा देण्याच्या सूचना पालिकेने गैरकायदेशीररित्या प्रयोगशाळांना दिला असल्याचा आरोप सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

    चाचणी अहवाल उशिरा मिळत असल्यामुळे उपचार मिळण्यास विलंब होत आहे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेसुद्धा सोमय्या यांनी म्हटले आहे. कोरोनाचा अहवाल २४ तासांमध्ये दिला गेला पाहिजे तरच आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो, असे सोमय्यांनी म्हटले आहे. तीन दिवस उशीरा रिपोर्ट देण्याचे निर्देश देणाऱ्या पालिका आयुक्तांवर कारवाई करा,अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.