ब्रेक द चेन अनलॉकच्या निकषानुसार दुस-या आठवड्यात मुंबईसह २१ जिल्ह्यांमध्ये ‘झाले मोकळे आकाश’

राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याच्या आज घेतलेल्या आढाव्यामध्ये कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत १० जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कोरोनाच्या जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार, मुंबई व उपनगर जिल्ह्यांसह नगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

    मुंबई : राज्य सरकारच्या ब्रेक द चेन अनलॉकच्या मागील सप्ताहात जाहीर करण्यात आलेल्या निकषानुसार दुस-या आठवड्याच्या आढाव्यात आता मुंबईसह २१ जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधीत रूग्णांचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) घसरला असून ऑक्सिजन बेडची उपलब्धतात देखील या जिल्ह्यात वाढल्याने सोमवारपासून सुरू होणा-या सप्ताहात राज्यातील ब-याच मोठ्या भागात नागरीकांना मोकळा श्वास घेता येणार आहे.

    २१ जिल्ह्यांत संसर्ग दर पाच टक्क्यांखाली

    कोविड-१९ संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील सप्ताहात घेतला होता. त्यानंतर आज प्रथमच राज्य सरकारने जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईसह राज्यात २१ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे मुंबईसह या जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या निकषानुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे निर्णय घेवू शकतात.

    सोमवारपासून निर्बंध शिथील

    राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याच्या आज घेतलेल्या आढाव्यामध्ये कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत १० जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कोरोनाच्या जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार, मुंबई व उपनगर जिल्ह्यांसह नगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

    मुंबईत २७.१२ टक्के ऑक्सिजन बेड रुग्ण व्याप्त

    असे असले तरी मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर कमी झाला असला तरी अद्यापही २७.१२ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. तर, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड सध्या रूग्णांनी व्यापले आहेत. सातारा जिल्ह्यात ४१.०६ टक्के तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१.५९ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत. या जिल्ह्यातील करोना संसर्गाचा दर अनुक्रमे १५.८५, ११.३० आणि ११.८९ इतका आहे.