यांना CDR मिळतो, मग… नाईक कुटुंब देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापले

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

    मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले. फडणवीस यांनी गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. फडणवीस यांनी अशी भूमिका अन्वय नाईक प्रकरणात ( का घेतली नाही असा सवाल उपस्थित करत नाईक कुटुंब देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापले.

    अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

    एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून फडणवीस यांना CDR रिपोर्ट मिळाला. तसा CDR आम्हाला का मिळाला नाही? आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही? अन्वय नाईक प्रकरणावेळी फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका का मांडली नाही? असे अनेक सवाल नाईक कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत.