मुंबईतून ३३ वर्षांपासून होता एक आरोपी फरार, अखेर शेरखानला शोधण्यात पोलिसांना आले यश

गेल्या ३३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक(arrest) करण्यात आज अंधेरी पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला मारहाणीच्या गुन्ह्यात तत्कालीन पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर सुटताच आरोपी फरार(absconding accused found after 33 years) झाला होता.

    मुंबई : गेल्या ३३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक(arrest) करण्यात आज अंधेरी पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला मारहाणीच्या गुन्ह्यात तत्कालीन पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर सुटताच आरोपी फरार झाला होता.

    सन १९८८ साली मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी शेरखान अब्दुल रेहमान खान (सध्याचे वय ५६) याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या न्यायालयीन कामकाजा दरम्यान शेरखान याला जामिनावर सोडण्यात आले. मात्र न्यायालयीन तारखांच्या वेळी शेरखान हा वारंवार गैरहजर राहू लागला. शेवटी शेरखान फरार झाल्याचे जाहीर करून न्यायालयाने त्याच्या अटकेचे आदेश दिले. तेव्हापासून शेरखानचा शोध सुरू असताना आज त्याला अटक करण्यात आली. शेरखानला महानगर दंडाधिकारी (रेल्वे मोबाईल न्यायालय) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले.