Acquittal of seven including Ashwin Naik; Mumbai Police fails to prove allegations

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने बुधवारी गँगस्टर अश्विन नाईकसह सात जणांची २०१५ च्या एका खंडणी संदर्भातील आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमोद केळुसकर, राजेश तांबे, प्रथमेश परब उर्फ सोन्या, जनार्दन सकपाळ उर्फ जन्या, अविनाश खेडेकर उर्फ अव्या, मिलिंद परब उर्फ काण्या, सुरजकुमार गोवर्धन पाल उर्फ सनी अशी या सात जणांची नावे आहेत.

    मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने बुधवारी गँगस्टर अश्विन नाईकसह सात जणांची २०१५ च्या एका खंडणी संदर्भातील आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमोद केळुसकर, राजेश तांबे, प्रथमेश परब उर्फ सोन्या, जनार्दन सकपाळ उर्फ जन्या, अविनाश खेडेकर उर्फ अव्या, मिलिंद परब उर्फ काण्या, सुरजकुमार गोवर्धन पाल उर्फ सनी अशी या सात जणांची नावे आहेत.

    या सर्वांविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. या सर्वांविरोधात मोक्कासह अपहरण, खंडणी आणि बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याचे आरोप करण्यात आले होते. सरकारी पक्ष यावेळी आरोपींवर लावलेले गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करू शकला नाही. त्यामुळे सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

    ९ डिसेंबर २०१५ रोजी अश्विन नाईकच्या सांगण्यावरून त्याच्या गुंडांनी एका विकासकाला उचलून नेले होते. त्यानंतर त्याला थेट अश्विन नाईकच्या एन. एम. जोशी रोडवरील ऑफिसमध्ये नेले. धमकावत ५० लाख रूपये आणि ६ हजार चौ.फूटांची जागा देण्याची धमकी देण्यात आली. त्यावेळी विकासकाने भितीपोटी ही गोष्ट मान्य केली.

    मात्र, सुटका होताच दादर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी गोळा करण्यासाठी आलेल्या अश्विन नाईकला रंगेहात अटक केली होती. मात्र, अश्विन नाईकसह सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले होते.