अभी तो कारवाई शुरू हुई है ! नियम मोडणाऱ्या बार, पब आणि हॉटेल्सवर कारवाई

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल, पब आणि बारचालकांवर बीएमसीकडून कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री खार आणि वांद्रे परिसरातील बार आणि रेस्टॉरंट्सवर पालिकेनं कारवाई केली. या कारवाईत एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. एका बारच्या व्यवस्थापकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. 

    राज्यात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याचं चित्र आहे. राज्याची राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येतंय.  या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबतचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करायला मुंबई महापालिकेनं सुरूवात केलीय.

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल, पब आणि बारचालकांवर बीएमसीकडून कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री खार आणि वांद्रे परिसरातील बार आणि रेस्टॉरंट्सवर पालिकेनं कारवाई केली. या कारवाईत एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. एका बारच्या व्यवस्थापकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय.

    साथ नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पालिकेनं ही कारवाई करायला सुरुवात केलीय. मुंबईत आटोक्यात येत असलेला कोरोना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वेगानं फैलावू लागल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर पालिकेनंही कारवाईचा वेग वाढवला आहे. शनिवारच्या रात्री सुमारे १४५ बार आणि पबवर छाडी टाकून तिथली तपासणी करण्यात आली. या ठिकाणाहून पालिकेनं ५० हजारांना दंड वसूल केला.

    मुंबईत बार आणि पब्स रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आलेत. कोरोनापासून बचावासाठीची सर्व खबरदारी हॉटेल चालकांनी घेणं अनिवार्य आहे. यात कसूर झाल्यास कडक कारवाई करण्यात येत आहे. खार, वांद्रे आणि माहिम भागातील काही रेस्टॉरंट्सवर पालिकेनं कारवाई केल्याची माहिती मिळेतय.