मेट्रोच्या कामासाठी मालाडमध्ये झोपड्यांवर कारवाई; कुरार व्हिलेजमध्ये मोठा गोंधळ

मेट्रो रेल्वे स्थानकासाठी कुरार व्हिलेज येथील झोपड्या अडथळे ठरत आहेत. त्या हटवण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि महापालिका यांनी नोटीस दिल्या होत्या. शनिवारी सकाळी पोलिसांचा फौजफाटा घेऊन येथील झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या भागातील स्थलांतरासाठी आमचा पाठिंबा आहे. त्यासाठी गिरगाव पॅटर्नप्रमाणे त्यांनाही योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी मागणी केली होती, मात्र ही मागणी नाकारून प्रशासनाने कारवाई केली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

    मुंबई : मालाड येथील कुरार व्हिलेज मेट्रो रेल्वे स्थानकाला अडथळा निर्माण करणाऱ्या झोपड्यांवर शनिवारी एमएमआरडीए आणि महापालिका यांनी कारवाई केली. या कारवाई विरोधात नागरिकांनी विरोध करीत संताप व्यक्त केला.

    मेट्रो रेल्वे स्थानकासाठी कुरार व्हिलेज येथील झोपड्या अडथळे ठरत आहेत. त्या हटवण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि महापालिका यांनी नोटीस दिल्या होत्या. शनिवारी सकाळी पोलिसांचा फौजफाटा घेऊन येथील झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या भागातील स्थलांतरासाठी आमचा पाठिंबा आहे. त्यासाठी गिरगाव पॅटर्नप्रमाणे त्यांनाही योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी मागणी केली होती, मात्र ही मागणी नाकारून प्रशासनाने कारवाई केली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

    गिरगाव येथे कारवाई करताना रहिवाशांना मोबदला देण्यात आला त्याप्रमाणे येथील रहिवाशांनाही मोबदला द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. योग्य मोबदला दिल्यास आम्ही जागा सोडण्यास तयार आहोत, अशी तयारीही स्थानिकांनी दर्शवली, मात्र ही मागणी एमएमआरडीएने नाकारली. पावसाळ्यात अशा प्रक्रारे झोपडपट्यांवर कारवाई करता येत नाही, असा कायदा असताना ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप रहिवाशांनी केली आहे.