mask

अन्न व औषध विभागाची धडक कारवाई महिन्याभरापासून सातत्याने सुरु आहे. मास्कची किंमती निश्चित करणारा आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जारी केला आहे. तरीही अनेक औषधांच्या दुकानात मास्क वाढीव दरात विक्री(mask sell with higher prize) केले जात असल्याची बाब समोर येत आहे.

मुंबई: मास्कची किंमती निश्चित करणारा आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जारी केला आहे. तरीही अनेक औषधांच्या दुकानात मास्क वाढीव दरात विक्री(mask sell with higher prize) केले जात असल्याची बाब समोर येत आहे. अनेक औषध विक्रेत्यांनी राज्य सरकारचा हा आदेश धाब्यावर बसविला आहे. अशा तब्बल १७१ दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा(action on 171 shops doing black market of mask) बडगा उगारला आहे. या औषध विक्री दुकानदारांना विभागाकडून कारणे दाखवा नोटीस (show cause notice to medicine sellers)बजावण्यात आली आहे. तसेच त्यांचे परवाने रद्द करण्याबाबतही एफडीए कारवाई करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अन्न व औषध विभागाची ही धडक कारवाई महिन्याभरापासून सातत्याने सुरु आहे. या मोहिमेत एफडीएने तब्बल ४ हजार विक्रेत्यांची झाडाझडती केली असून यात १६७ विक्रेत्यांनी मास्कची चढ्या भावात विक्री केल्याचे आढळून आले आहे. तर औषधांचे इतर गैरप्रकार केलेल्यांची संख्या १७२ जणांवर कारवाई केली असून गंभीर गैरप्रकार केलेल्या १७१ जणांवर एफडीएने कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मास्कचे दर नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी एक समितीदेखील गठीत केली होती. या समितीने मास्कच्या किमती १० ते ४० रुपये इतक्या केल्या आहेत. पण तरीही औषध विक्री करणारे दुकानदार १०० रुपयांपेक्षा जास्त दराने मास्क विकत असल्याची तक्रार वारंवारं एफडीएकडे येत होत्या, त्याआधारे कारवाईचा बडगा उगारला जात असून येत्या काही दिवसातही ही कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.