आम्ही सुधरणारच नाही! बाबुलनाथ मंदिराजवळच्या ‘संस्कृती हॉल’ मधील लग्नसोहळ्यावर कारवाई; ५० हजार रुपये दंडासह गुन्हा दाखल

'संस्कृती हॉल' मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती मिळताच विभाग कार्यालयाच्या पथकाने धाड टाकली असता तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले, येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नसल्याचे आढळून आले.

    मुंबई : बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केल्या प्रकरणी सभागृहावर रुपये ५० हजार दंड आकारून लग्न सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हा करण्यात आला आहे. गावदेवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

    ‘संस्कृती हॉल’ मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती मिळताच विभाग कार्यालयाच्या पथकाने धाड टाकली असता तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले, येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नसल्याचे आढळून आले.

    हा प्रकार कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन असल्याने हॉलवर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई केली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने संबंधित हॉल चालकांवर तात्काळ ५० रुपये हजार दंड ठोठावण्यात आला. तसेच हॉल चालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.