
महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभू यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र पाठवले होते. अशा पद्धतीचे स्टिकर्स आपल्या सामाजिक ऐक्यास धोका ठरु शकतात अशी भिती हर्षल यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत अशा प्रकारच्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतलीय.
मुंबई : उत्तर प्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या वाहनांवर कारवाई होणार आहे. महाराष्ट्रातील एका शिक्षकाने पत्राद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या या पत्राची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे.
उत्तर प्रदेशचे राजकारण हे जातींभोवती फिरणारे आहे. म्हणूनच इथे जात खुप मॅटर करते. मागील काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात वाहनांच्या नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगण्याचं एक नवीन फॅडच आलं आहे.
यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींची नावे दर्शवणाऱ्या नंबर प्लेट येथील वाहनांवर पहायला मिळतात. या नंबर प्लेटच्या माध्यमातून सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभू यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र पाठवले होते. अशा पद्धतीचे स्टिकर्स आपल्या सामाजिक ऐक्यास धोका ठरु शकतात अशी भिती हर्षल यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत अशा प्रकारच्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतलीय. उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेली वाहने जप्त करण्यात येणार आहेत.