आएगा तो मोदीही, ट्विटरवरून अनुपम खेर यांचा दावा, कोरोनाच्या स्थितीवरून नेटिझन्समध्ये खलबतं

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका नेटिझन्स करत आहेत. कोरोनाच्या लसींबाबतचं नियोजन करण्यात सरकार सर्वस्वी अपयशी ठरल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणं रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठादेखील होत नसल्यामुळं अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुरु असलेली टीका अभिनेते अनुपम खेर यांना सहन न झाल्यानं अखेर त्यांनी आपलं मौन सोडत, आएगा तो मोदीही असं ट्विट केलंय. 

    देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. सुरुवातीला महाराष्ट्रातूनच कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असल्याचं चित्र होतं. मात्र आता इतर राज्यांमध्येही कोरोना वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर नेटिझन्स टीका करतायत.

    कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका नेटिझन्स करत आहेत. कोरोनाच्या लसींबाबतचं नियोजन करण्यात सरकार सर्वस्वी अपयशी ठरल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणं रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठादेखील होत नसल्यामुळं अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता यांची केंद्र सरकारवर केलेली टीका अभिनेते अनुपम खेर यांना सहन न झाल्यानं अखेर त्यांनी आपलं मौन सोडत, आएगा तो मोदीही असं ट्विट केलंय.

    सरकारवर टीका करणाऱ्या गुप्तांच्या ट्विटला त्यांनी उत्तर देताना म्हटलंय, हे तर जरा अधिकच झालं. तुमच्या दर्जापेक्षाही जास्त. कोरोना हे एक संकट आहे. पूर्ण जगासाठी. आपण या संकटाचा सामना यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका जरूर करावी पण आपलीदेखील तितकीच जबाबदारी आहे. घाबरू नका. आएगा तो मोदीही. जय हो. असं ट्विट अनुपम खेर यांनी केलंय.

    देशात अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीत, अनेक राज्यांत ऑक्सिजनची कमतरता आहे, रुग्णांचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या नियोजनाअभावी आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याची टीका अनेक नेटिझन्स करत आहेत. तर त्याला काही सेलेब्रिटींकडून उत्तरही दिलं जातंय.