‘आशिकी’ फेम अभिनेते राहुल रॉय अतिदक्षता विभागात, डॉक्टर म्हणाले रॉय यांना….

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. ते बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. एलएसी-लिव्ह द बॅटल या चित्रपटाचं शूटिंग खूप उंचीवर सुरू होतं. त्यामुळे तिथं ऑक्सिजनची कमतरता होती. इतर टीम सदस्यांनाही श्वास घ्यायला त्रास होत होता.

बॉलिवूडमधील आशिकी या सुपरहिट चित्रपटाचा नायक राहुल रॉय यांना शूटिंगदरम्यान अचानक ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि स्ट्रोकचा त्रास झाला.

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे तातडीने मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल सध्या एलएसी – लिव्ह द बॅटल या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. ते बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. एलएसी-लिव्ह द बॅटल या चित्रपटाचं शूटिंग खूप उंचीवर सुरू होतं. त्यामुळे तिथं ऑक्सिजनची कमतरता होती. इतर टीम सदस्यांनाही श्वास घ्यायला त्रास होत होता.

बॉलीवूडमधील सहकलाकार राहुल रॉय लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतायत.

राहुल रॉय यांनी १९९० सालच्या आशिकी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली, की त्यानंतर त्यांनी लागोपाठ ४७ चित्रपट साईन केले होते. मात्र आशिकी चित्रपटाइतका इतर कुठलाच चित्रपट हिट होऊ शकला नाही आणि उत्तरोत्तर त्यांची लोकप्रियता कमी होत गेली. बिग बॉसचा पहिला सिझन जिंकल्यानंतर राहुल रॉय पुन्हा चर्चेत आले होते.