अभिनेत्री कंगना रणौत मुंबईतील निवासस्थानी दाखल

अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) मुंबई विमानतळावरुन थेट आपल्या घरी मुंबईतील (Mumbai) निवासस्थानी दाखल झाली आहे. कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र विमानतळाबाहेर शिवसेना आणि रिपाई कार्यकर्ते आमने-सामने पाहायला मिळाले आहेत.

 मुंबई :  अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) मुंबई विमानतळावरुन थेट आपल्या घरी मुंबईतील (Mumbai) निवासस्थानी दाखल झाली आहे. कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र विमानतळाबाहेर शिवसेना आणि रिपाई कार्यकर्ते आमने-सामने पाहायला मिळाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कंगनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांच्या सुरक्षेत कंगना आपल्या घरी पोहोचली. तिच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. परंतु आता कंगना आपल्या घरी दाखल झाल्यानंतर थेट आपल्या कार्यालयाल भेट देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महनगरपालिकेने कारवाई केली. याप्रकरणी कंगनाचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर उच्च न्यायालयाने मनपाला कारवाई तुर्तास थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कंगना राणौतला उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे.