आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

मुंबई - देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन केला होता. त्याच दरम्यान अपुऱ्या मनुष्य बळाच्या आधारावर महापालिकेने पावसाळापूर्व कामांना जोर

 मुंबई – देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन केला होता. त्याच दरम्यान अपुऱ्या मनुष्य बळाच्या आधारावर महापालिकेने पावसाळापूर्व कामांना जोर धरल्याचे सांगितले होत. याचाच आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व नगरसेवकांशी संपर्क साधून घेतला. सर्व नगरसेवकांच्या वार्डातील अडचणी आणि पावसाळापूर्व कामांवर चर्चा केली. दरम्यान कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबतही माहिती घेतली. आणि घाबरु न जाण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार सर्व वॉर्ड मध्ये वॉर रुम उघडण्यात येणार आहेत. या वॉर रुम मध्ये काही अडचणी आल्या तर त्या त्वरित सोडविल्या जातील असे आवाहनही केले आहे. 

पावसाळापुर्व कामांवर चर्चा करताना जर गरज भासल्यास नाले सफाईसाठी नवीन मशीन कार्यांन्वित करु असे महापौर यांनी सांगितले. सर्व नालेसफाई उत्तम रित्या करण्याचे आदेश दिले आहे. सर्व नगरसेवकांचे प्रश्न लिहून घेतले आहेत. तसेच पाठपुरावा करुन त्वरित सोडविले जातील आसा इशारा देखील केला आहे.