पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी अदित्य ठाकरेंची वर्णी

समितीच्या अध्यक्षपदावर पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारासाठी राज्याकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांची शिफासरस केली जाणार आहे.

मुंबई : राज्य सरकारने पद्म पुरस्कार समिती तयार केली आहे. समितीच्या अध्यक्षपदावर पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारासाठी राज्याकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांची शिफासरस केली जाणार आहे. 

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोलाची कामगिरी केलेल्या उमेद्वारास पुरस्कारासाठी शिफारस करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीत ५ कॅबिनेट, २ राज्यमंत्री, प्रधानसचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी अशा ९ सदस्यांचा समावेश असणार आहे. 

भारतात दरवर्षी २६ जानेवारीला हे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला जातात. राष्ट्रपतींनी सही केलेले सनद आणि पदक या पुरस्करात दिले जाते. राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस केंद्राकडे करण्याचे कार्य ही समिती करत असते. 

या समितीत सरकारने उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकान दत्तात्रय भरणे यांची या पद्म पुरस्कार समितीत समावेश केला आहे.