आदित्य ठाकरेंचा वाढदिवशी नवजात बालकाला मदतीचा हात, बालकाचा मृत्यूशी संघर्ष

मुंबई - आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशीच मोठा मदतीचा हात पुढे केला. जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असणाऱ्या अर्भकाला मदतीचा हात दिला आहे. नवजात बालक गेले सहा दिवस मृत्यूशी संघर्ष करत आहे. आदित्य

 मुंबई – आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशीच मोठा मदतीचा हात पुढे केला. जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असणाऱ्या अर्भकाला मदतीचा हात दिला आहे. नवजात बालक गेले सहा दिवस मृत्यूशी संघर्ष करत आहे. आदित्य ठाकरे यांनी १ लाख रुपये नवजात बालकाच्या पित्याकडे सुपूर्द केले आहेत. 

आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी सर्व कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहान केले होते. आपला वाढदिवस मदत कार्य करुन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. घणसोलीतील अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज आहेत. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे.

सरकारी रुग्णालयात जन्माला आलेल्या या अर्भकाच्या जन्मापासुनच धोका होता असे सरकारी डॉक्टरांनी सांगितले  होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे काही सुधारणा झाली नाही म्हणुन बाळाच्या पित्याने फोर्टीस रुग्णालयात बाळाला दाखल केले. नवजात बाळाच्या वडिलांची परिस्थीती बेताची असल्याने त्यांनी अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळताच कार्यकर्त्याने संबंधित माहिती आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली. 

कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच आदित्य ठाकरेंनी मदत केली आहे. आणि अर्भकाच्या उपचाराचा पुढील खर्चही उचलण्याचं आश्वासन दिले आहे. अर्भकावर उपचार सुरु आसुन पित्याने आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत.