Aditya Thackeray's idea is very expensive; The cost of one day's maintenance of a penguin is equal to one worker's monthly salary

  मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची(Aditya Thackeray) संकल्पना असलेल्या महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणीच्या बागेतील) पेंग्वीन(Mumbai Rani Baug Penguins) म्हणजे कंत्राटदारांसाठी राणी बागेतील ३ वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. पेंग्विनवर होणारा खर्च शिवसेनेसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे असा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या शिवसेना-काँग्रेसमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

  बाहेरुन कंत्राटदार  नेमण्याची गरज काय?

  भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिकेने १५ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. या खर्चावर कॉंग्रेसने सवाल उपस्थित केला आहे. यापूर्वी गेल्या ३ वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला 11 कोटी देण्यात आले आहेत. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणे शक्य असतांनाही बाहेरुन निविदा काढून कंत्राटदार  नेमण्याची गरज काय? असा सवाल महापालिकेतील कॉंग्रेसचे विरोधी  पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे.

  एका दिवसाचा एका पेंग्विनचा खर्च २० हजार

  या बाबत राजा यांनी सवाल केले आहेत की. प्रत्येक वर्षी ५ कोटी रुपये का खर्च केले जाणार आहेत. २०१८ मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा ११ कोटीचा करार करण्यात आला होता. तो आता संपत आहे . ही रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल. या मध्ये एका दिवसाचा एका पेंग्विनवरचा खर्च २० हजार दाखविण्यात आला आहे. तर  एका दिवसाचा ७ पेंग्विनवरचा मिळून खर्च १.५ लाख रुपये होणार आहे. एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च सहा लाख एका महिन्याचा ७ पेंग्विनचा खर्च ४२ लाख एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च ७१लाख, एका वर्षाचा ७ पेंग्विनवरचा खर्च ५ कोटी एकूण ३ वर्षांसाठी ७ पेंग्विनचा खर्च १५ कोटी असा हिशेब देण्यात आला आहे.

  कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च

  पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षाच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल.

  तीन वर्षात एक पिल्लु आणि नर पेंग्विनचा मृत्यु

  दरम्यान २०१७ दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य,विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लु पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यु झाला आहे.