शिवसेनेत जुने विरूद्ध नवे संघर्षामुळे आदित्य ठाकरेंचं नाव

पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत जुने विरूद्ध नवे असा संघर्ष सुरू असून त्यातूनच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत राजपूत आत्महत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत असं भाजपा नेते नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख हे देखील तरूण मंत्री आहेत. मात्र, यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

१३ तारखेला परिवहन मंत्री अनिल परब यांनीच ट्विट करत पार्टी झाल्याचं सांगितलं. त्यामुळे अनिल परब यांना काय माहिती आहे? याची चौकशी व्हायला हवी. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.

काँग्रेसप्रमाणे आता शिवसेनेतही जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु झाला असून शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असून त्यातून विरोधकांना नाहक बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे,अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.