लक्षद्वीपमध्ये प्रशासकाचे निर्णय तर्कहीन, शरद पवारांचे नरेंद्र मोदीना पत्र, पंतप्रधानाच्या हस्तक्षेपाची केली मागणी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात पवार यांनी लिहिले आहे की, लक्षद्वीप प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे स्थानिक नागरिकांचे उपजीविकेचे पारंपारिक साधने आणि स्थानिकांची संस्कृती नष्ट होत आहे. या नियमांमुळे याआधीही अशांतता पसरली होती आणि या निर्णयांना विरोध झाला. त्यामुळे प्रशासक पटेल यांच्या आदेशांवर आणि नियमांवर पुनर्विचार व्हावा. लक्षद्वीप प्रशासनाने हे तर्कहीन आदेश रद्द करावेत.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारने नेमलेले प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्याकारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात टीका करताना लक्षद्वीपमध्ये प्रशासक पटेल यांनी घेतेलले निर्णय तर्कहीन असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यान या निर्णयांमुळे लक्षद्वीपमधील लोकांकडून त्यांचे उपजीविकेचे पारंपारिक साधन आणि या बेटाची अनोखी संस्कृती नष्ट होईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

    स्थानिकांची संस्कृती नष्ट होत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात पवार यांनी लिहिले आहे की, लक्षद्वीप प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे स्थानिक नागरिकांचे उपजीविकेचे पारंपारिक साधने आणि स्थानिकांची संस्कृती नष्ट होत आहे. या नियमांमुळे याआधीही अशांतता पसरली होती आणि या निर्णयांना विरोध झाला. त्यामुळे प्रशासक पटेल यांच्या आदेशांवर आणि नियमांवर पुनर्विचार व्हावा. लक्षद्वीप प्रशासनाने हे तर्कहीन आदेश रद्द करावेत. प्रफुल पटेल यांनी विकासाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्यावरील अनेक मच्छिमारांची घरे उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याशिवाय असामाजिक वर्तन प्रतिबंधक कायदा, 2021, लक्षद्वीप पशु संरक्षण कायदा, 2021 आणि कोविड-19 स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमधील (SOP) बदल देखील नागरिकांच्या असंतोषामागे आहेत.